Loksabha 2019 : मावळमधून 32 तर, शिरूरमधून 27 उमेदवारांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून 32 उमेदवारांचे 45 अर्ज तर, शिरूरमधून 27 उमेदवारांचे 38 अर्ज दाखल झाले आहेत. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी उद्या (ता.10) रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 12 एप्रिलपर्यंत आहे.

Web Title: 32 nominations from Maval and 27 candidates for Shirur