Loksabha 2019 : आदित्यचा ‘संवाद’

Loksabha 2019 :  आदित्यचा ‘संवाद’

पिंपरी - ‘‘हो, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्याशी ‘संवाद’ साधतोय,’’ अशी कबुली युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरीत दिली. निमित्त होते ‘आदित्य संवाद’ या अराजकीय कार्यक्रमाचे. मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आदित्य यांनी तरुणाईशी संवाद साधून त्यांची मते शिवसेनेकडे खेचण्याचा प्रयत्न केला. 

मुंबईतील नाईटलाइफ उपक्रम पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळ्यात राबवाल का? असे एका तरुणाने विचारल्यावर आदित्य म्हणाले, ‘‘लोणावळ्यासह अन्य पर्यटनस्थळीही नाईटलाइफ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याची संपूर्ण महाराष्ट्रात आवश्‍यकता असून, त्यामुळे रोजगारात दुपटी-तिपटीने वाढ होईल.’’ 

तरुणाईने विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देत ‘संवाद’ रंगला. तरुणाईच्या प्रश्‍नांबरोबरच अनधिकृत बांधकामांसंदर्भातील शास्तीकर, नाईटलाइफ, बैलगाडा शर्यत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती, तुम्ही राजकारणात का आलात? असे राजकीय प्रश्‍नही विचारल्याने निवडणूक प्रचार सभेचे काहीसे स्वरूप संवादाला आले. त्याचा लाभ घेत, ‘मावळ व शिरूरमधील महायुतीच्या उमेदवारांना पुन्हा संसदेत पाठवा,’ असे आवाहनही त्यांनी केले. 

मनसेबरोबर युतीची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र, शिवसेना-भाजपची युती देशहित आणि हिंदुत्वामुळे झाली आहे, ती गेल्या चाळीस वर्षांपासून टिकून असल्याचेही त्यांनी नमूद केले. संवाद झाल्यानंतर आदित्य यांनी आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांच्याशी प्रचाराबाबत  चर्चा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com