#Loksabha 2019 : डॉ.अमोल कोल्हेंच्या प्रचार रॅलीमध्ये एकावर कोयत्याने वार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीमध्ये एका कार्यकर्त्यावर पक्षातीलच एकाने कोयत्याने वार करुन हॉकीस्टीकने मारहाण केली. हा घटना रविवारी सायंकाळी सात वाजता हडपसरमध्ये घडली. 

अन्वर इनामदार (वय 30, रा. सय्यदनगर, हडपसर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यावरुन अफान इनामदार, सुफीयान इनामदार, मुसाहीफ सय्यद, अदनाम शेख, इरफान पठाण यांच्यासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून रविवारी हडपसर परिसरात पक्षाचे उमेदवार डॉ.कोल्हे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरुन फिर्यादीचे आरोपींबरोबर भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी हडपसरमधील हॉटेल सुब्हानअल्ला येथे अन्य कार्यकर्त्यांसमवेत चहा पित होते. त्यावेळी आरोपी प्रचारादरम्यानच्या भांडणांचा बदला घेण्यासाठी हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हॉकीस्टीकने मारहाण केली. तर एकाने त्याच्याकडील कोयता काढून फिर्यादी यांच्यावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले अ

Web Title: Attack on one by sharp Weapon in Dr Amol Kolhe campaign rally