Loksabha 2019 : भाजपच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीचे तिकीट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : गेल्या काही वर्ष भारतीय जनता पक्षातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अनिल जाधव यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदार संघासाठी तिकीट देण्यात आले आहे. बुधवारी त्यांनी मोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

जाधव हे भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती मानली जात. जाधव हे भाजपचे सदस्य नसले तरी त्यांनी पक्षाच्या अनेक उपक्रमांत सहभाग घेतला होता. गेल्या 15 वर्षांपासून ते सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांची राज्य सरकारच्या जिल्हा जेल समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान 6 महिन्यांपूर्वी त्यांनी या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

युवक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना प्रेरित होऊन ते भाजपचे काम करू लागले. मात्र आपला केवळ सत्तेसाठी वापर करण्यात येत आहे. सत्तेत जाण्याची वेळ येते तेव्हा प्रस्थापित एकत्र येऊन बहुजनांना डावलतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांना भेटून पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती, अशी माहिती वंचित आघाडीकडून देण्यात आली. 

Web Title: The BJP worker has a ticket for the deprived Bahujan Agahadi