Loksabha 2019 : आढळराव पाटलांच्या रॅलीत भाजपचे कमळ उलटे!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

शिरुर लोकसभा मतदारसंघात निकालापूर्वीच कमळचे चिन्ह उलटे झाले.

लोकसभा 2019 
शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हा सामना चांगलाच तापला आहे. एकीकडे कोल्हे यांच्या प्रचार गाजत असताना दुसरीकडे आढळराव पाटील यांची रॅलीही चर्चेत आहे.

लोणी काळभोर येथे आज (ता. 15) सकाळी निघालेली प्रचार रॅली आतीशबाजी करुन, कार्यकर्त्यांनी फेटे घालून, हाती झेंडे पकडत गाड्यांवर फिरुन काढण्यात आली. पण या रॅलीत चर्चेचा विषय होता तो म्हणजे पक्षाचा झेंडा. भाजपचे चिन्ह असलेले कमळ झेंड्यावर प्रचारातच उलटे पडल्याचे चित्र दिसून आले. 
 
दरम्यान, नुकतीच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांची भेट झाली यावरून सोशल मिडियावर चांगल्याच चर्चाँना उधाण आले होते.

Web Title: The BJPs flag was held in the wrong direction at the Rally of the Shivajirao Adhalarao Patil