Loksabha 2019 : कॉंग्रेसकडे मातोंडकरांसाठी वेळ, माझ्यासाठी नाही - प्रवीण गायकवाड 

Loksabha 2019 : कॉंग्रेसकडे मातोंडकरांसाठी वेळ, माझ्यासाठी नाही - प्रवीण गायकवाड 

पुणे -  कॉंग्रेसकडे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी वेळ आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करीत सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून त्यांची अवहेलना केली जाते, अशा शब्दांत प्रवीण गायकवाड यांनी कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. तसेच लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही त्यांनी गुरुवारी सष्ट केले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक कॉंग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (कवाडे व गवई गट), बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी पक्ष व इतर समविचारी पक्ष-संघटनांच्या मेळाव्याचे एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे करण्यात आले होते. त्या वेळी गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राज्य प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रविकांत वर्पे आदी या वेळी उपस्थित होते. सरकारचे अपयश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. 

गायकवाड म्हणाले, ""कॉंग्रेसकडून पुण्याच्या उमेदवारीबाबत अद्याप घोषणा झाली नाही. कॉंग्रेस पक्षाला आमचे विचार चालतात, काम चालते, पण आमची उमेदवारी चालत नाही. त्यामुळे मी उमेदवारीबाबत माघार घेतली आहे. मात्र, यापुढे कॉंग्रेसच्या उमेदवाराचे काम करणार आहे.'' राज्यातील इतर जागांवर कॉंग्रेसला आयात उमेदवार चालतात. मी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. असे असतानादेखील उमेदवारी नाकारण्यात आल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com