Loksabha 2019 :  लोकशाही घराणेशाहीतून मुक्त झाली पाहिजे - आंबेडकर 

Loksabha 2019 :  लोकशाही घराणेशाहीतून मुक्त झाली पाहिजे - आंबेडकर 

पुणे - ""देशातील लोकशाही काही कुटुंबांमध्ये कैद झाली आहे. लोकशाही फुलवायची असेल, तर तिची घराणेशाहीतून मुक्तता केली पाहिजे. त्यातून सामान्य माणसांचे प्रश्‍न सुटतील,'' असा विश्‍वास वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केला. 

आघाडीचे पुण्यातील उमेदवार अनिल जाधव, बारामतीचे उमेदवार नवनाथ पडळकर, जुन्नरचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ऍड. आंबेडकर बोलत होते. जाधव, पडळकर, धनगर समाजाचे नेते अण्णाराव पाटील, माजी आमदार हरिदास भदे, भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, शहराध्यक्ष अतुल बहुले, सुजात आंबेडकर, प्रवक्‍त्या दिशा शेख, एमआयएमचे शहराध्यक्ष लियाकत शेख, नगरसेविका अश्‍विनी लांडगे, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि रिपब्लिकन सेनेचे विवेक बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते. 

ऍड. आंबेडकर म्हणाले, ""मोदी आणि शहा देशात अराजकता माजवण्याचे काम करीत आहेत. कॉंग्रेस तीन नंबरचा पक्ष असून, आमची लढाई थेट भाजपशी आहे. कॉंग्रेस आणि आमच्यात कितीही वाद झाले, तरी आम्ही भाजपबरोबर जाणार नाही. सत्ता आल्यानंतर मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना तुरुंगात टाकायचे आहे.'' 

कॉंग्रेसने मदत करावी 
कॉंग्रेसच्या खादीमध्ये खाकी शिरायला लागली आहे. पुण्यातून कोण उमेदवार द्यायचा, यावरून कॉंग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ होता. शेवटी जोशी यांना बळीचा बकरा करण्यात आला. कॉंग्रेसला आवाहन करतो, की त्यांनी उघडपणे आम्हाला मदत करावी. पक्ष धर्मवादी होत असल्याची भीती कॉंग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कॉंग्रेस पुन्हा सेक्‍युलर करायचा असेल, तर वंचित आघाडीला मतदान करा, असे ऍड. आंबेडकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com