कारणराजकारण : कॅन्टोन्मेंट परिसरात विकासकामे मंजूर; अंमलबजावणीची वानवा

गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातील भागात निवडणुकीच्या निमित्ताने 'सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे. 

एमजी रस्ता : कारणराजकारण या उपक्रमाअंतर्गत येथील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यावर येथील नागरिकांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. सरकारी शाळा मोफत असतात. मात्र कॅन्टोमेंटची नवी इमारत बांधल्यामुळे विद्यार्थ्यांकडून शाळेचे शुल्क घेतले जातात. अशी तक्रार नागरिकांनी केली.

परिसरात शौचालय सुविधा नाही, बांधण्यासाठीचं अनुदान नाही. केवळ जागा कळावी म्हणून गावपातळीवर शौचालय बांधण्यासाठी जमिनीची नोंदी घेतल्या आहेत. मात्र अनुदानच आलेलं नाही. घोरपडीचा पूल मंजुर होऊनही बांधलेला नसल्याचा खंत नागरिकांनी व्यक्त केला. पूल नसल्याने वाहतूक कोंडी फार होत आहे. विशेषतः रेल्वे क्रॉसिंग परिसरात लोकांना वाहतूकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. 

पुणे कॉन्टेममेन्ट बोर्डाने ठराव पास केला आहे, ज्यामध्ये महापालिका ज्या सेवा देते ते कॉन्टेममेन्ट बोर्डाच्या परिसरातील नागरिकांनाही मिळाल्या पाहिजेत. इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा प्रलंबित आहे. अजून यासाठी येथील लोक झगडत आहेत. बांधकामाला परवानगी मिळत नसल्याने लोक त्रस्त आहेत. उच्च शिक्षण घेऊही रोजगाराच्या संधी तरुणांपर्यंत पोहोचत नाही. अशी खंतही स्थानिक तरुनांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with citizens at MG Road in Cantonment Board Pune