Election Results : शिरुर मतदारसंघात अटीतटीचा लढत; डॉ. अमोल कोल्हे यांना जनतेचा कौल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात अटीतटीचा लढत आहे. छोट्या पडद्यावर संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना जनतेने कौल दिला आहे. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मात दिली आहे.

आठव्या फेरी अखेर कोल्हे यांना 17 हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. आढळराव यांना दोन लाख 51 हजार 828, तर कोल्हे यांना दोन लाख 69 हजार 268 मते मिळाली आहे. बहुजन वंचित आघाडीच्या राहुल ओव्हाळ यांनीही 16 हजार 305 मते मिळविली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Kolhe is leading in Shirur constituency