पराभवाच्या खात्रीनेच गिरीश बापटांचे मानसिक संतुलन बिघडले : मोहन जोशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

पुण्यात पराभूत होणार याची खात्री झाल्यामुळेच गिरीश बापट हे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि भ्रमिष्ठासारखे ते बोलू लागले आहेत. - मोहन जोशी

लोकसभा 2019
पुण्यात काँग्रेसला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हता; शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी चाकण येथे जाहीर सभेत केले, हे वाचून करमवणूक झाली. कारण पुण्यात पराभूत होणार याची खात्री झाल्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि भ्रमिष्ठासारखे ते बोलू लागले आहेत.

'पुण्यात काँग्रेस पक्षात इच्छुक उमेदवार होते त्यातून माझी उमेदवार म्हणून झालेली निवड पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने योग्य वेळी जाहीर झाली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष यांनी अतिशय जोमाने प्रचार करून या निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाच्या पाया रचला. तूरडाळ घोटाळ्यातील भ्रष्टाचार, 'हिरवा देठ'चा संदर्भात त्यांची संस्कृतिहीनता, पुण्याचे नागरी प्रश्न आणि विकास याबाबतची त्यांची निष्क्रियता आणि भाजपामध्ये त्यांच्या बद्दल असणारा असंतोष या पार्श्वभूमीवर उसने अवसान आणून ते निवडणूक लढत होते. माझी उमेदवारी जाहीर झाली, त्याक्षणी त्यांचा पराभव निश्चित झाला होता. पक्षाचा खासदार बदलून गिरीश बापटांना उमेदवार दिली,ही मोठी चूक झाली याची जाणीव भाजपला झाली. यातूनच गिरीश बापट पराभूत मानसिकतेत गेले. मतदानानंतर आपला पराभव निश्चित आहे हे लक्षात आल्यावर ते भ्रमिष्ठासारखे बोलू लागले आहेत. त्यातच 'साठी बुद्धी नाठी' ही म्हण देखील त्यांना लागू झाली आहे. चाकण येथील जाहीर सभेतील त्यांचे विधानाकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. त्यांनी मानसिक उपचार करून घेऊन लवकर बरे व्हावे.'
- मोहन जोशी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat has started speaking like a lunatic because of the convincing defeat