Election Results : पुण्यातून गिरीश बापट आघाडीवर 

Election Results : पुण्यातून गिरीश बापट आघाडीवर 

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून त्यामध्ये भाजप-सेना युतीची उमेदवार गिरिश बापट 8 ते 10 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे समजते. 

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून पालकमंत्री गिरीश बापट, कॉंग्रेस आघाडीकडून मोहन जोशी तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव हे उमेदवार उभे होते. तब्बल महिनाभरानंतर आज गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही मतमोजणी केंद्रावर गर्दी केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अजमावणाऱ्या पालकमंत्री बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पार्थ अजित पवार यांच्यासह 93 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
पुणे जिल्ह्यातील चार जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. पुणे शहरात 10.34 लाख (49.84 टक्के), मावळमध्ये 13.66 लाख (59.49 टक्के) शिरूरमध्ये 12.92 लाख (59.46 टक्के), तर बारामतीमध्ये 12.99 लाख (61.54 टक्के) मतदान झाले. यंदा प्रथमच मतदानाच्या वेळी "व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यात आला. पुण्यात भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत होत आहे. 

मतदारसंघात असे आहेत उमेदवार 
पुणे : 31 
मावळ : 21 
बारामती : 18 
शिरूर : 23 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com