कारणराजकारण : निवडणुका होतात पण नगररोडवर वाहतूक कोंडी कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

शिक्रापूर : नगर रस्त्यावर शिक्रापूर भागात होणारी वाहतूक कोंडी हा चर्चेचा मुद्दा आहे. यंदाही निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघात वाहतूक कोंडी हा विषय महत्वाचा ठरेल. स्थानिकांच्या सांगण्यानुसार फक्त निवडणुकीपुरती यावर चर्चा होते. उपाययोजना मात्र होताना दिसत नाही.

शिक्रापूरच्या स्थानिकांशी संवाद साधल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, येथील वाहतूक कोंडी हाच मूळ आणि कळीचा मुद्दा आहे. या वाहतूक कोंडीचा इथल्या स्थानिक व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो असं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मागील महिन्यात एक अध्यादेश काढला होता. त्यानुसार सकाळी सहा ते साडे आठ आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ जड वाहनावर बंदी घालण्यात आली होती. त्याचे पालन मात्र झालेले दिसून येत नाही. असे नागरिकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर 'सकाळ' अभिनव प्रयोग करीत आहे. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांमधील गावा-गावांमध्ये लोकांशी संवाद साधतानाच स्थानिक प्रश्नांचा वेध 'सकाळ' घेत आहे आणि कोणते मुद्दे अग्रक्रमांवर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा घडवून आणत आहे.

Web Title: The issue of traffic congestion on the nagar road in Shirur constituency