Loksabha 2019 : आयटी कंपन्यांत मतदानाला सुटी नाही 

Loksabha 2019 : आयटी कंपन्यांत मतदानाला सुटी नाही 

पुणे - पिंपरी- चिंचवड परिसरातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मागील आठवड्यात झालेल्या मतदानाच्या दिवशी सुटी दिली होती. परंतु, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी या कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली नाही. परिणामी कामावर जाण्यापूर्वी सकाळीच कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावावा लागला. 

पिंपरी, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, थेरगाव परिसरातील बहुतांश मतदान केंद्रांवर आयटी आणि अन्य कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी सकाळीच हजेरी लावल्याचे चित्र होते. मतदान झाल्यानंतर केंद्राच्या आसपासच्या परिसरातूनच "कार पुलिंग'ची सेवा वापरण्यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला. काही कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी सुटी नसल्याने "वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडला. पिंपरी- चिंचवड परिसरात सुमारे सव्वातीनशे आयटी कंपन्या आहेत. यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी आहेत. मतदानासाठी कंपन्यांनी 23 एप्रिलला सुटी दिली होती. त्यामुळे 29 एप्रिलला सुटी जाहीर न करता मतदानाच्या वेळेनुसार कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. 

पुणे लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होते, त्यादिवशी सुटी दिलेली होती. परंतु, बहुतांश आयटी कर्मचारी हे पिंपरी- चिंचवड परिसरात राहत असल्याने त्यांचे मतदान सोमवारी होते. सोमवारी सुटी दिली नव्हती, मात्र मतदान झाल्यानंतर कामावर येण्याची सूचना होती. 
- स्नेहा टिळेकर-धाडगे, आयटी कर्मचारी, पिंपळे गुरव 

बहुतांश आयटी कंपन्यांमधील कर्मचारी हे पुणे परिसरात राहत असल्याने या कंपन्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना सुटी दिली होती. याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी पर्यायी सुटी द्यावी किंवा मतदानाच्या वेळेनुसार कामाच्या वेळेतून सवलत द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. 
- विद्याधर पुरंदरे, सचिव, सॉफ्टवेअर एक्‍स्पोटर्स असोसिएशन ऑफ पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com