Loksabha 2019: वढूत बापट, आढळराव आणि कोल्हेंच्या गळाभेटी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- गिरीश बापट, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर
- गिरीश बापट आणि अमोल कोल्हे यांची गळाभेट

कोरेगाव भीमा : वढू ब्रुदूक इथे भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. या कार्यक्रमाला गिरीश बापट, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे हजर होते.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे 5 एप्रिलला छत्रपती संभाजी महाराजांच्या 330व्या बलिदान स्मरण दिन कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, स्मृती समिती तसेच पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांनीही सोमवारी वढू येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी डॉ. वारके व पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदींसह पोलिस अधिकाऱ्यांनी वढू बुद्रुक येथे भेट देऊन सर्वांशी संवाद साधत सकारात्मक वातावरणात कार्यक्रम करण्याचे आवाहन केले. तसेच, येणाऱ्या शंभुभक्तांसाठी आवश्‍यक सुविधांची पाहणीही केली. 

या वेळी सर्व समाजातील ग्रामस्थांसह वढू बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी व धर्मवीर श्री संभाजी महाराज स्मृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, माजी सरपंच साहेबराव भंडारे, सुनीता भंडारे, संतोष शिवले, सचिन भंडारे, संजय शिवले, संभाजी भंडारे, स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, लक्ष्मणराव भंडारे, पांडुरंग गायकवाड, पोलिस पाटील जयसिंग भंडारे उपस्थित होते. दरम्यान पार्किंग, वाढीव बसफेऱ्या, ड्रोन कॅमेरे, सर्व बाजूंनी नाकाबंदी व रोड बंदोबस्त, पहाटे पाचपासून वाहनांना बंदी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Web Title: kolhe Greet girish bapat and shivajirao adhalrao pati at tulapur