Loksabha 2019 : मावळात नियोजनाच्या बैठका अन्‌ आदिवासींना हाक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळ तालुक्‍यात प्रचाराला वेग आला असून, विविध घटकांचे मेळावे, घोंगडी बैठका व गावभेटीद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे. 

वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मावळ तालुक्‍यात प्रचाराला वेग आला असून, विविध घटकांचे मेळावे, घोंगडी बैठका व गावभेटीद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे. 

वडेश्वरला आदिवासी मेळावा 
टाकवे बुद्रुक : आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी गुरुवारी वडेश्वर येथे आदिवासी मेळावा घेण्यात आला. गुजरातचा पॅटर्न जाऊन आता हिंदुत्वाच्या पॅटर्न राबवू पाहणाऱ्या मोदी सरकारला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी केले. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, माउली दाभाडे, बबनराव भेगडे, बाळासाहेब ढोरे, बापूसाहेब भेगडे, चंद्रकांत सातकर, अशोक बाफना, अर्चना घारे, निखिल वडोरा, शोभा कदम, बाबूराव वायकर, गोविंद साबळे, शंकर सुपे आदी उपस्थितीत होते. 

बरोरा म्हणाले, "आदिवासी बांधवांना लोकसंख्येच्या नुसार विकास निधी उपलब्ध करून देणारे देशातील पहिले नेते शरद पवार आहेत. अजित पवार कामाचे वाघ, वाघाचा बछडा वाघच असतो. त्यामुळे पार्थ पवारांना लोकसभेत पाठवा. आदिवासींची जाण आणि कदर पवारांना आहे, त्याची जाणीव ठेवून सर्व समाजाने पार्थ पवारांच्या मागे उभे राहावे.'' 

आंदर मावळात घोंगडी बैठका 
पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार यांनी आंदर मावळात गावभेटी केल्या. मिंडेवाडी, जाधववाडी, बधलवाडी, नवलाख उंबरे, मंगरूळ, आंबळे, निगडे या गावात बैठका घेण्यात आल्या. जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, अतिष परदेशी, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, संभाजी टेमगिरे, दत्तात्रेय पडवळ, विक्रम कदम, शिवाजीराव पवार, शिवाजी असवले आदी उपस्थित होते. 

भाजपची नियोजन बैठक 
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा शुक्रवारी आंदर मावळ दौरा असून, त्यासाठी वडगावातील भाजप कार्यालयात गुरुवारी नियोजन बैठक झाली. भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी उपसभापती शांताराम कदम, मदन शेडगे, यशवंत तुर्डे आदी उपस्थित होते. 

बारणे यांच्या प्रचारासाठी पवन मावळात दौरा 

पवनानगर : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पवन मावळातील पवना धरणाच्या आतील गावांमध्ये गुरुवारी प्रचार दौरा काढण्यात आला. जवण, अजिवली, शिळिंब, वाघेश्वर, चावसर, मोर्वे व तुंग येथे गावागावांत जाऊन मतदारांच्या बैठका घेण्यात आल्या. ग्रामीण भागात भाजप-शिवसेना व आरपीआयची मोठी ताकद आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मताधिक्‍य मिळवून द्यावे, असे आवाहन आमदार बाळा भेगडे यांनी केले. प्रचारप्रमुख भास्करराव म्हाळसकर, गणेश भेगडे, भारत ठाकूर, गणेश धानीवले, किरण राक्षे, संदीप काकडे, संदीप काशीद, देविदास कडू, बाळासाहेब घोटकुले, अंकुश पडवळ, शंकर लोखंडे, विठ्ठल घारे, गणेश ठाकर, संदीप भुतडा, एकनाथ पोटफोडे आदी उपस्थित होते. 

Web Title: Loksabha 2019 : Tribal and Planning meeting In Maval