Loksabha 2019 : अमोल कोल्हेंची संपत्ती साडेचार कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार
डॉ. अमोल कोल्हे यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे साडेचार कोटी इतकी आहे.
त्यांच्याकडील वाहनाची किंमत 24 लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे अडीच लाखांचे तर, पत्नीकडे सुमारे आठ लाख रुपयांचे दागिने आहेत.

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार
डॉ. अमोल कोल्हे यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे साडेचार कोटी इतकी आहे.
त्यांच्याकडील वाहनाची किंमत 24 लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे अडीच
लाखांचे तर, पत्नीकडे सुमारे आठ लाख रुपयांचे दागिने आहेत.

कोल्हे यांच्यावर 50 लाख रुपयांचे वैयक्‍तिक कर्ज तर, सुमारे 15 लाख
रुपयांचे गृहकर्ज आहे. त्यांनी विविध बॅंका, टपाल आणि शेअर्समध्ये सुमारे
57 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर जुन्नर
तालुक्‍यातील नारायणगाव येथे सुमारे साडेसहा एकर जमीन आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Amol Kolhe Property