Loksabha 2019 : काँग्रेसच्या वतीने शनिवारी १०० संविधान बचाव सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शहरात दोनशे ठिकाणी कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या वतीने शनिवार (ता. १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींच्या  पूर्वसंघ्येला शहरात शंभर ‘संविधान बचाव सभा’ घेण्यात येणार आहेत.

पुणे - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शहरात दोनशे ठिकाणी कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या वतीने शनिवार (ता. १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींच्या  पूर्वसंघ्येला शहरात शंभर ‘संविधान बचाव सभा’ घेण्यात येणार आहेत.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत आहे. काँग्रेसकडून उमेदवार निश्‍चित करण्यास विलंब झाला आहे. बापट यांचा गेल्या काही दिवसांपासून प्रचार सुरू आहे. याउलट जोशी यांना वेळ कमी मिळाला आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काँग्रेस आघाडीकडून सर्व स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

बापट यांच्या प्रचारार्थ पुढील दहा दिवसांत शहरातील सहा मतदारसंघात दोनशे कोपरा सभा घेण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे. त्यानुसार या सभा देखील सुरू झाल्या आहेत. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंतीचे निमित्त साधून शनिवारी (ता. १३) शहरात एकाच वेळी शंभर ठिकाणी ‘संविधान बचाव सभा’ घेण्याचे नियोजन काँग्रेस आघाडीने केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र मिळून या सभा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये आघाडीतील सर्व पक्षांची नेतेमंडळी सहभागी होणार आहेत. या सभेच्या माध्यमातून केंद्रातील सरकाराकडून घटना बदल करण्याचे सुरू असलेल्या प्रयत्नांची पोलखोल करणार आहेत.

Web Title: Loksabha Election 2019 Cogress Constitution Save Speech Politics