Loksabha 2019 : महाजन यांच्या शिष्टाईने बारणे-जगताप मनोमिलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील तीव्र मतभेद संपविण्यात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. त्यामुळे महायुतीला मावळात मोठा दिलासा मिळाला आहे. 

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील तीव्र मतभेद संपविण्यात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. त्यामुळे महायुतीला मावळात मोठा दिलासा मिळाला आहे. 

मावळात बारणे यांच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांचा विरोध होता. गेला आठवडाभर निरनिराळ्या पातळीवर जगताप यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते. बारणे यांच्या विजयासाठी जगताप यांचे प्रचारात सक्रिय होणे गरजेचे असल्याने बारणे यांनी जगताप यांची भेट घेतली होती. मात्र, तरीही ते सक्रिय झाले नव्हते. अखेर जगताप यांचे मन वळविण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली, त्यात त्यांना यश आले. 

याबाबत पिंपरीचे शिवसेनेचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, ‘‘नगरवरून गिरीश महाजन खास जगताप यांना भेटण्यासाठी आले होते. जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील बंगल्यावर सायंकाळी एक तास बैठक झाली. त्या बैठकीला मी उपस्थित होतो. महाजन यांनी मतदारसंघाच्या प्रचाराचा आढावा घेतला. तसेच, मावळ मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याचे सांगितले. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यास सांगितले. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने येथील मतदारसंघात सक्रिय होण्यास महाजन यांनी जगताप यांना सांगितले.’’

Web Title: Loksabha Election 2019 Girish Mahajan shrirang barne Laxman Jagtap Politics