Loksabha 2019 : पुण्यातून जोशींसह दहा उमेदवारांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातून बुधवारी दहा उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. ४) हा शेवटचा दिवस आहे.

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातून बुधवारी दहा उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. ४) हा शेवटचा दिवस आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन रामकिसन जोशी, ए. सईद एम. रशीद आरकाटी (अपक्ष), विजयप्रकाश अनंत कोंडेकर (अपक्ष), याबेस ऊर्फ अमोल शमुवेल तुजारे (अपक्ष), राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल (हमारी अपनी पार्टी), अनिल नारायण जाधव (वंचित बहुजन आघाडी), राजेश नारायण खडके (अपक्ष), उत्तम पांडुरंग शिंदे (बहुजन समाज पक्ष), जया कृष्णा शेट्टी (अखिल भारतीय सेना) आणि जाफर खुर्शिद चौधरी (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात जोशी, अग्रवाल आणि जाधव यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. 

बारामतीसाठी ११ अर्ज  
बारामती लोकसभा मतदारसंघातून बुधवारी सात उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागनाथ रघुनाथ शिंदे (बहुजन मुक्‍ती पार्टी), सागर शिवाजी कोंडेकर (अपक्ष), मंगेश नीलकंठ वनशिव (बहुजन समाज पक्ष), विजयप्रकाश अनंत कोंडेकर (अपक्ष), नवनाथ विष्णू पडळकर (वंचित बहुजन आघाडी) आणि दशरथ नाना राऊत (भारतीय प्रजा सुराज्य) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वनशिव यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. बारामती मतदारसंघातून आजअखेर एकूण २२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

शिरूरमधून एकही अर्ज नाही 
शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. आज काही इच्छुकांनी अर्ज नेले. परंतु अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने 
दिली.

Web Title: Loksabha Election 2019 Mohan Joshi Candidate Form Submit Politics