Loksabha 2019 : लोकसभेच्या पूर्वतयारीला वेग

Election-Commission-Office
Election-Commission-Office

पिंपरी - मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जवाटप व स्वीकृतीसाठी आवश्‍यक पूर्वतयारीला वेग आला आहे. आकुर्डीतील मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विविध कक्ष सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण, राजकीय पक्षांसमवेत बैठक आदी कार्यवाही सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डीतील प्रशासकीय इमारतीत सहाव्या मजल्यावर मावळ लोकसभेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दोन ते नऊ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्जवाटप व स्वीकृती होणार आहे. त्याची व्यवस्था प्राधिकरण इमारतीतील सातव्या मजल्यावर असणार आहे. उमेदवारांना द्यावयाची माहिती पुस्तिका, अर्जवाटप व स्वीकृती, छाननी आदींची पूर्वतयारी सुरू आहे. 

निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी मावळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. खालापूर येथे मंगळवारी दुसरी बैठक आयोजित केली आहे. प्राधिकरण इमारतीतील तळमजल्यावर इनवर्ड-आऊटवर्ड, मीडिया सेल, मदत केंद्र, तक्रार निवारण आणि माहिती कक्ष आदींची सुविधा केली आहे.

भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स, व्हिडिओ विव्हिंग आदी पथक कार्यान्वित केले आहेत. मावळ मतदारसंघातंर्गत मावळ, चिंचवड, पिंपरी, पनवेल, कर्जत आणि उरण असे सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यातील शहरामध्ये पिंपरी- हेडगेवार भवन (प्राधिकरण) आणि चिंचवड - ग प्रभाग कार्यालय (थेरगाव) अशी दोन कार्यालये सुरू केली आहेत. 

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त (पुणे) रमेश काळे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर अशा सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये त्यासाठी सुरू केली आहेत. त्यातील भोसरी मतदारसंघाचे कार्यालय पिंपरी-नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरील महापालिकेच्या नवीन इमारतीत सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com