Loksabha 2019 : पुण्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अनिश्‍चितताच

Congress
Congress

पुणे - आयात उमेदवाराला तिकीट मिळणार नसल्याची चर्चा काँग्रेसमध्ये थंडावली होती. मात्र, सोमवारी पुन्हा पक्षाबाहेरील उमेदवाराचे नाव पुढे आल्याने मोहन जोशी, रमेश बागवे आणि अरविंद शिंदे यांनी दिल्ली गाठली. निष्ठावंत उमेदवाराला तिकीट द्यावे, अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली. काँग्रेसकडून आता नेमके कोणाला तिकीट मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सोमवारी पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर होणार होते. मात्र, या घटनांमुळे ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी जोशी, शिंदे, अभय छाजेड आणि प्रवीण गायकवाड हे इच्छुक आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोशी यांच्या नावाला पसंती दिली आहे; तर  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिंदे यांचे नाव लावून धरले आहे. प्रदेशात एकमत न झाल्याने उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला आहे. उद्या (मंगळवार) सकाळपर्यंत पुण्यातील उमेदवार निश्‍चित होईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले असले तरी त्याबाबत अनिश्‍चितता वाढली आहे.

दरम्यान, पक्षाकडून उमेदवार निश्‍चित करण्यास वेळ लागत असला, तरी निवडणुकीत प्रचाराची रणनीती काय असावी, यावर शहर काँग्रेसकडून यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत बापट यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, त्यांच्याकडून झालेल्या चुका यावर प्रचारात भर दिला जाणार आहे. 

एकीकडे प्रचाराच्या नियोजनाबरोबरच दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघातील वॉर्डस्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना व्हिव्हिपॅडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून प्रचाराची दिशा निश्‍चत करण्यात आली आहे. 

उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार असल्याचे शहर काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

प्रचार साहित्यांचे नव्याने दरपत्रक
जिल्हा प्रशासनाने उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे दर निश्‍चित केले होते. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेऊन पत्रकातील दरांची फेररचना करून नव्याने दर जाहीर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com