Loksabha 2019 : विद्यार्थी बनले स्वयंसेवक

थेरगाव - साने गुरुजी आदर्श विद्यानिकेतनमध्ये वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी असलेली शालेय विद्यार्थी स्वयंसेवकांची फौज.
थेरगाव - साने गुरुजी आदर्श विद्यानिकेतनमध्ये वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी असलेली शालेय विद्यार्थी स्वयंसेवकांची फौज.

पुणे - मतदानाचा दिवस म्हणून कडक इस्त्री केलेला गणवेश घालून चक्क शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्राच्या आसपास राहणारे हे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून वृद्ध व दिव्यांग मतदारांना सहकार्य करीत होते अन्‌ त्यांच्यामध्ये उत्साहही दिसत होता.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड परिसरात विविध मतदान केंद्रांना ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने भेटी दिल्या. त्या वेळी काही केंद्रांवर शालेय विद्यार्थी मतदारांचे स्वागत करीत असल्याचे दिसून आले. मतदान केंद्रावर येणाऱ्या ‘मतदारराजा’ला ‘मतदार सहायक कक्ष तेथे आहे’, ‘तुमचा खोली क्रमांक येथे आहे’, ‘मतदार यादीत नाव पाहायचे असेल, तर त्या टेबलवर जा’, असे सांगत हे विद्यार्थी सहकार्य करीत होते. त्याशिवाय, केंद्रावर एखादा वृद्ध नागरिक काठी टेकवत आल्यास तत्परतेने ते त्यांच्या सहकार्यासाठी धावत असल्याचे चित्र थेरगावमधील सानेगुरुजी आदर्श विद्यानिकेतनमध्ये पाहायला मिळाले.

केंद्रांवर सुविधांचा अभाव
पिंपरीतील बहुतांश मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांच्या सोयीसाठी व्हीलचेअर नसल्याचे दिसून आले. काही शाळांमधील मतदान केंद्रे ही पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर वृद्ध नागरिकांचा उत्साह लक्ष वेधून घेत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com