Loksabha 2019 : शिरूरमध्ये इतिहास घडवा - अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे राहून निवडणुकीत इतिहास घडवावा,’’ असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

आळेफाटा - ‘सर्वसामान्यांची ताकद एकवटली की इतिहास घडतो. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभे राहून निवडणुकीत इतिहास घडवावा,’’ असे आवाहन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.    

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आज कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी वरील आवाहन केले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पांडुरंग पवार, संजय काळे, किशोर दांगट, अशोक घोलप, गणपत फुलवडे, शरद लेंडे, तुषार थोरात, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, उज्ज्वला शेवाळे आदी उपस्थित होते. 

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील शिरोली-सुलतानपूर, निमगाव सावा, साकोरी, पारगाव, मंगरूळ, रानमळा, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, बेल्हे, राजुरी, बोरी बुद्रुक, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, उंब्रज आदी गावांत मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार फेरी तसेच ठिकठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्‍याला शेठबाबांनंतर (स्व. निवृत्तिशेठ शेरकर) दुसऱ्यांदा खासदारकीची संधी आहे. शिरूर मतदारसंघ हा सर्वांचे लक्ष लागून राहिलेला राज्यातील दुसरा मतदार संघ आहे. जुन्नर तालुक्‍यातून मला पडणाऱ्या भरघोस मतांची चर्चा संपूर्ण देशात व्हावी.’’ पांडुरंग पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shirur History Amol Kolhe Politics