Loksabha 2019 : आता लक्ष शिरूर, मावळवर

Politics
Politics

पुणे - शहरातील लोकसभा निवडणूक आटोपल्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचार व नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची कुमक शहरातून रवाना झाली आहे. नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांचा त्यात समावेश आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात निकराचा सामना होत आहे. राष्ट्रवादीचे पुण्यात ४१ नगरसेवक आहेत, तसेच संघटनात्मक ताकदही जास्त आहे. त्यामुळे येथील नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मावळ आणि शिरूरमधील प्रचारात सहभागी होण्याची सूचना केली आहे. या प्रचार मोहिमेचे नियोजन पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले आहे. रवींद्र माळवदकर यांच्याकडे पिंपरी विधानसभा मतदारसंघ, बाबूराव चांदेरे यांच्याकडे चिंचवड मतदारसंघ, मावळमध्ये विजय कोलते, तर भोसरी विधानसभेसाठी दत्तात्रेय धनकवडे यांच्याकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. वडगाव शेरी आणि शहरातील नगरसेवक, कार्यकर्ते मावळमध्ये सहभागी झाले आहेत. हडपसर-वानवडीमध्ये पक्षाचे २० नगरसेवक आहेत. त्यांना त्याच भागावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.

कात्रज-धनकवडीचाही काही भाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांनाही त्याच भागावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. पक्षाच्या महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे तसेच विद्यार्थी, युवती, मागासवर्गीय आदी विभागांनाही मावळ-शिरूरसाठी जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रभागासाठी एक समन्वयक नियुक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com