Loksabha 2019 : टक्कर शिरूरमधील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने
डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे राहील, याविषयी.. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने
डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे राहील, याविषयी.. 

शिवाजीराव आढळराव पाटील -
  वय - ६२ 
  शिक्षण - इंटरमिजीएट (आर्टस) 

डॉ. अमोल कोल्हे -
  वय - ३८ 
  शिक्षण - एमबीबीएस 

जमेच्या बाजू - शिवाजीराव आढळराव पाटील
विद्यमान खासदार म्हणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात यश 
मागील १५ वर्षांपासून मतदारसंघात संपर्क 
जुन्नर, खेड, शिरूर व हडपसर या चार मतदारसंघांत भाजप-सेनेचे आमदार 
हडपसर मतदारसंघातही शिवसेनेची मोठी ताकद 
सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत भाजप- शिवसेनेचे प्राबल्य 

जमेच्या बाजू - डॉ. अमोल कोल्हे
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून मतदारसंघातील घरा-घरांत पोहोच 
पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे शिवसेनेतील मित्रपरिवाराकडून छुपी मदत मिळण्याची शक्‍यता 
मनसेचा जाहीर पाठिंबा 
जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य. 
तरुण व नवा चेहरा  

विरोधातील मुद्दे - शिवाजीराव आढळराव पाटील
  सलग चौथ्यावेळी निवडणूक रिंगणात असल्याने अँटी इन्कंबन्सीचा धोका 
  खेड विमानतळ पुरंदरला गेल्याने नाराजी 
  बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक महामार्ग व रेल्वेचे काम अपूर्ण

विरोधातील मुद्दे - डॉ. अमोल कोल्हे
  राजकारणात नवखे असल्याने, मतदारसंघात संपर्क तुलनेने कमी 
  कलाकार की राजकारणी असा संभ्रम 
  मतदारसंघातील प्रश्‍न, समस्यांची कमी जाण,
 राष्‍ट्रवादीतील गटबाजीचा फटका

पक्षाला शिरूर मतदारसंघात मिळालेले यश (१९५२ पासून) 
मतदारसंघातील पक्षीय बलाबल 
महायुती

विद्यमान खासदार (स्वतः उमेदवार), शिवसेना व भाजपचे मिळून चार आमदार

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी 
एक आमदार, दोन पंचायत समिती, एक नगरपालिका आणि सोळा जिल्हा परिषद सदस्य. 

२०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते 
  शिवसेना - 6 लाख 43 हजार 415 
  राष्ट्रवादी काँग्रेस - 3 लाख 41 हजार 601


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shirur shivajirao adhalrao Amol Kolhe Politics