Loksabha 2019: माझ्या सभांना उत्तर भारतातून मागणी: राज ठाकरे

गुरुवार, 18 एप्रिल 2019

- माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे.
- माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत आहे
- हिंदीत सभा घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
- मात्र, मला हिंदीतून एखादी शिवीसुद्धा देता येणार नाही.

पुणे: पंतप्रधान मोदी आणि शहांविरोधात महाराष्ट्रात प्रचार करतो आहे, पण माझा प्रचार देशभर ऐकला, पाहिला जात आहे. माझ्या संभांना उत्तर भारतातून मागणी होत आहे आणि हिंदीत सभा घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, आपले बरे आहे. मला हिंदीतून एखादी शिवीसुद्धा देता येणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत सांगितले. 

मोदींवर देशाने विश्वास दाखविला, तेच मोदी आता लोकांना दिलेल्या स्वप्नांवर बोलत नाहीत. निवडणूक खेळण्यासाठी मोदी आता आपल्या जातीचा मुद्दा पुढे करत आहेत. आता जातीचे कार्ड वापरत आहेत. आता जातीचा वापर करता? मग पाच वर्षांत दलितांवरील अन्यायाचे काय झाले? मोदींवर देशाने विश्वास दाखविला, तेच मोदी आता लोकांना दिलेल्या स्वप्नांवर बोलत नाहीत. निवडणूक खेळण्यासाठी मोदी आता आपल्या जातीचा मुद्दा पुढे करत आहेत. आता जातीचे कार्ड वापरत आहेत. आता जातीचा वापर करता? मग पाच वर्षांत दलितांवरील अन्यायाचे काय झाले? असा थेट प्रश्नही राज ठाकरे यांनी मोदींना केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मोदींचे मित्र गोमांसाची निर्यात करतात ते चालते ? त्यावर मोदी काहीच का बोलत नाहीत. लोकांना जगण्यासाठी पैसे मिळत नाहीत, मात्र मोदी पुतळयांवर कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. देशाला पुतळ्यांची गरज आहे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
 

Web Title: My rallies have high demand in north India too says Raj Thackeray in Pune