Election Resuts : विजयाचे श्रेय जनतेला : अमोल कोल्हे 

shirur_kolhe.jpg
shirur_kolhe.jpg

पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांना भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीदरम्यान झालेल्या टीकेबाबत कोल्हे म्हणाले, ''जातीपातीच्या राजकारणाला आजचा तरूण जुमानत नाही, हेच या विजयातून सिद्ध झाले आहे. जनतेनेच ही निवडणकूक हातात घेतली आणि मला निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही मोठी मदत झाली. स्थानिक नेते, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, मानसिंग पाचंदुकर, प्रदीप कंद, योगेश ससाणे, चेतन तुपे, विलास लांडे, दिलीप मोहिते पाटील यांनी झटून काम केले. या विजयाचा मी नम्रतापूर्व स्विकार करतो. 
मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणे यासाठी प्राधान्य देणार आहे. 

आपल्या विजयामध्ये "स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा किती वाटा आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ही मालिका जनतेने पाहिली त्यामुळे सर्व श्रेय जनतेलाच आहे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com