पुण्यात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा खोडसाळ- चव्हाण

पुण्यात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा खोडसाळ- चव्हाण

पुणे- मी सातारा लोकसभेचे नियोजन तसेच निवडणूक प्रचारासंबंधीच्या अन्य जबाबदाऱ्या पार पाडत असताना पुण्यात मला उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. या चर्चा म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळशी (सरकारनामा) बोलताना स्पष्ट केले.

चव्हाण पुढे म्हणाले की, पुण्याची जागा पक्ष अत्यंत गांभीर्यपूर्वक लढणार आहे. त्यासाठी तेथील वातावरणासाठी योग्य असलेल्या उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. या चर्चेमागे कोण आहे काय असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ही वेळ एकत्र लढण्याची आहे एवढेच मी बोलू इच्छितो.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर दिल्लीत खलबते सुरूच असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रवीण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारच्या चर्चांना माध्यमाध्ये आणि सोशल मिडियावर उधाण आले होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com