Loksabha 2019 : पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील जळगाव निवडणुक लढणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला असून 'संधी मिळाल्यास त्याचे सोने कर,' असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. 

पुणे : अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लढण्याची शक्यता आहे. पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला असून 'संधी मिळाल्यास त्याचे सोने कर,' असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. 

पाटील सध्या पुणे पोलिस दलात अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत आहेत. पाटील मुलचे जळगाव 5 पारवड तालुक्यातील तामसवाडी रहिवासी आहेत. त्यांचे मोठे बंधु गावी शेती करतात. पाटील यांनी 'साहेबा फाउंडेशन' आणि गावतीर्थ महादेव मंदिर ट्रस्टतर्फे व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले आहे. तरुणांना रोजगार, शेतकरी प्रश्न यावर काम केले आहे.

जळगावचे नागरीक व भाजप कार्यकर्ते यांनी पाटील यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून पुढे केले असल्याचे पाटील यांनी नमुद केले. 'जळगाव जिल्हा येथे मी पूर्वीपासुनच चांगले काम उभे केले आहे. त्याच्या आधारावरच निवडणुक लढण्यास इच्छूक आहे. संधी मिळाली तर त्याचे सोने करु,' असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Punes Additional Commissioner of Police Sahebrao Patil will contest for Jalgaon Loksabha elections