Loksabha 2019 : महायुतीच्या बारामती विजयासाठी व्यूहरचना तयार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे : भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडक व मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमवेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संजय काकडे यांनी निवडणुकीचे नियोजन केल्याची खात्रीशीर माहिती आहे. 

भोर व खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेची ताकद असून खासदार संजय काकडे यांना माननाऱ्यांचे मोठे जाळे या दोन्ही मतदार संघात मोठे आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून कांचन कुल यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासंदर्भात नियोजन झाले असून बारामतीची जागा जिंकण्यासंदर्भातले गनिमीकावे निश्चित करून खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची व्यूहरचना पक्की झाल्याची माहिती आहे. 

खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महसूलमंत्री पाटील यांच्यासमवेत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला माजी आमदार शरद ढमाले, शिवसेनेचे कुलदिप कोंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब दळवी, रमेश कोंडे, स्वाती ढमाले, भाजपाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, भाजपा माथाडी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश धाडवे, महेश पासलकर आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज सकाळीच खासदार काकडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी काकडे कुटुंबातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

Web Title: strategy for victory of Alliance in baramati is ready