Loksabha 2019 : सुनेत्रा पवार यांच्या नात्यातील 6 जण निवडणुकीच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : निवडणूकीत नाती-गोती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात घराणेशाही सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे राज्यातील इतर मतदार संघात एकूण 6 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

पुणे : निवडणूकीत नाती-गोती हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात घराणेशाही सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे राज्यातील इतर मतदार संघात एकूण 6 नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. 

पवार यांच्या घरातच सुनेत्रा पवार यांच्या नणंद सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघात तर, मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षातून उभे राहिले आहेत. बारामती मतदारसंघात भाजपने सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रीय पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पवार कुटुंबियाच्या जवळच्या कुटुंबातील असून सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारनेच कांचन या कुल घराण्याच्या सुनबाई झाल्या आहेत. त्यामुळे नात्यातील या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

बारामती तालूक्यातील वडगाव-निंबाळकर तालुक्यातील राजे निंबाळकर प्रस्थापित आहे. या कुटुंब उस्मानाबादमधील पाटील कुटुंबीयांशी जवळचे संबध असून सुनेत्रा पवार या पाटील कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. पाटील कुटुंब हे राजकारणात सक्रिय असलेले कुटुंब आहे. सुनेत्रा पवार यांचे भाचे कुणाल रोहिदास पाटिल काँग्रेस पक्षातून धुळे मतदार संघातून निवडणूकीत उभे राहिले आहेत. सुनेत्रा पवार यांचे एक पुतण्या ओमराजे निंबाळकर शिवसेना पक्षातून तर दुसरा पुतण्या राणा रणजित सिंह पाटील राष्ट्रवादी पक्षातून उस्मानाबाद मतदार संघातून निवडणूकीत उभे आहेत. सुनेत्रा पवार यांचे बंधू राणा जगजित सिंह पाटील यांचे सुपुत्र रणजित सिंह पाटील आहेत.  

अजित पवार यांना या निवडणूकीत नाईवाईकांच्यासोबत किंवा नाते वाईकांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे असे दिसते. पवार कुटुंबियांचा नात्यागोत्यांचा हा गुंता पाहाता राजकारणात घराणेशाही सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Sunetra Pawar 6 relatives are competing in the election