Loksabha 2019 :...म्हणून मी माघार घेतोय : प्रविण गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी गायकवाड इच्छूक होते. त्यांचे नाव दिल्लीमध्येही पोचले होते. त्यावर गांभीर्यानेही विचार सुरू होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात काही अनपेक्षित घडामोडींमुळे पर्यायी उमेदवाराचे नाव आघाडीवर आले आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी त्यांच्या मनातील खदखद सकाळशी बोलताना व्यक्त केली. तत्पूर्वी युवक संघटनांच्या मेळाव्यातही त्यांनी या बद्दल सुतोवाच केले.  

पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडून रेड कार्पेट टाकले जाते, पण २५-३० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि 58 वेळा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करत सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवत त्यांची अवहेलना केली जाते, त्यामुळे लोकसभेसाठी कॉग्रेसकडून उमेदवारीसाठी मी माघार घेत आहे. त्यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी, असे म्हणत प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या भावनांना गुरुवारी वाट मोकळी करून दिली. 

काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी गायकवाड इच्छूक होते. त्यांचे नाव दिल्लीमध्येही पोचले होते. त्यावर गांभीर्यानेही विचार सुरू होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात काही अनपेक्षित घडामोडींमुळे पर्यायी उमेदवाराचे नाव आघाडीवर आले आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी त्यांच्या मनातील खदखद सकाळशी बोलताना व्यक्त केली. तत्पूर्वी युवक संघटनांच्या मेळाव्यातही त्यांनी या बद्दल सुतोवाच केले.  

उमेवारीसाठी गायकवाड गेली काही दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. शिवाय काँग्रेसची उमेदवारी मिळो, अथवा ना मिळो, तरीही काँग्रेस प्रवेश करणारच अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

दुसरीकडे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा प्रवेश तातडीने झाला. यावर आक्षेप घेत  गायकवाड  यांनी, सामाजिक कार्याची अवहेलना करून तारकांना उमेदवारी देणाऱया काँग्रेसने कोणालाही उमेदवारी द्यावी, मी माघार घेत आहे, अशी भूमिका घेतली आहे. उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेस उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: therfore Praveen Gaikwad withdrawing his name