कारणराजकारण : स्वतःचा जीव देऊ पण, पुरंदर विमानतळ होऊ देणार नाही

टिम ई सकाळ
बुधवार, 10 एप्रिल 2019

''भारतीय जनता पक्षाला आजिबात मत देणार नाही. कारण भाजपला मत म्हणजे विमानतळाला मत. सुप्रिया सुळे यांनी जर विमानतळा विरोधात भूमिका घेतली तर, त्यांना मत देऊ अऩ्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ, अशी भूमिका शेतकरी नागरिकांनी घेतली.
 

पुणे : पुरंदर परिसरामध्ये उभारण्यात येत असलेल्या विमानतळाला पारगावच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. येथील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानतळासाठी जमिनी दिली जाणार नाही. विमानतळ निर्मितीचा नारळ फोडण्यासाठी जो कोणी येईल त्यालाच नारळासारखा फोडून काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी केला आहे.

'सकाळ'च्या कारणराजकारण या उपक्रमामध्ये फेसबुक लाईव्हवर पारगावच्या नागरिकांनी पुरंदर विमानतळाविरोध करण्यासाठी मतदानावर बहिष्कार घातला आहे. आम्ही आमच्या जमिनीसाठी वेळ पडली तर, बलिदान देऊ पण जमिनी विमानतळासाठी देणार नाही. मग, आम्हाला कितीही पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्‍य नाही. 

''विमानतळाला जमिनी देऊन आम्ही जाणार कोठेही जाणार नाही. आमचं घर-दार, जनावरे, जमिनी सोडणार नाहीत'', अशा प्रतिक्रिया देताना स्थानिक नागरिकांना अश्रु अनावर झाले. ''आमच्या जमिनी बागायती असून त्या विमानतळाला न देण्याचा निर्णय पारगावच्या गावकऱ्यांनी घेतल्यामुळे स्थानिक आमदार आणि प्रशासनाने आमच्या जमिनीचे पाणी अडवले आहे. मात्र, पाणी अडवून आमच्या जमिनी विमानतळासाठी घेण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण, विमानतळासाठी कोणी येथे आले तर, त्यांना नारळासारखे फोडून काढू, अशा संतप्त प्रतिक्रिया नागिराकांनी दिला. तसेच विमानतळाऐवजी परिसरामध्ये रुग्णालये, महाविद्यालये, कारखाने आदी या भागात आली पाहिजेत.'' ,असेही त्यांनी सांगितले. 

त्याचबरोबर ''विमानतळ येथून हलविण्यासाठी जो आमच्या बाजूने उभा असेल त्याच्यामागे आम्ही उभे राहू.'' ,असे या नागरिकांनी सांगितले. ''भारतीय जनता पक्षाला आजिबात मत देणार नाही. कारण भाजपला मत म्हणजे विमानतळाला मत. सुप्रिया सुळे यांनी जर विमानतळा विरोधात भूमिका घेतली तर, त्यांना मत देऊ अऩ्यथा आम्ही आमची भूमिका घेऊ, अशी भूमिका शेतकरी नागरिकांनी घेतली.
 

Web Title: Want Airport? Forget Vote said Purandar Villagers