Loksabha 2019: देवेंद्रजी हे तुम्ही मोदींना सांगायला हवे होते ..... 

Loksabha 2019: देवेंद्रजी हे तुम्ही मोदींना सांगायला हवे होते ..... 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर झाली. या सभेत पंतप्रधान देशांसमोर असेलेल्या काही बेरोजगारी, दुष्काळ यासारख्या गंभीर समस्येवर बोलतील अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी सांगितले कि  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. त्याच बरोबर नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर निशाना साधत पवार कुटुंबात अंतर्गत कलह असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची दांडी गुल्ल झाली. शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत. तसेच, अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण मोदींनी आपल्या भाषणात करून दिली. ते म्हणाले की, 'विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.' ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. एवढी छोटी छोटी माहिती घेऊन मोदींनी विरोधकांवर टीका केली.

अर्थात, ही सर्व माहिती मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली असणार. पण, महाराष्ट्राबद्दल खरी माहिती मोदींना नव्हती कि त्यांना अडचण होईल म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. राज्यातलं खरं वास्तव काय आहे ते पाहूया. गेल्या चार वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे.

राज्यातील 360 पैकी 150 तालुक्यांमध्ये अर्थात अर्ध्या महाराष्ट्रात नुकताच दुष्काळ जाहीर केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला लिहीलेल्या पत्रात राज्य सरकारने म्हटले आहे की, 2011 आणि 2014 या चार वर्षांच्या काळात जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत होते तेव्हा 6268 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र, त्यानंतर जानेवारी 2015 ते डिसेंबर 2018 मध्ये हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. या आकडेवारीत 91 टक्के वाढ होऊन 11995 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण हे कर्ज, शेतमालाचा भाव आणि पीक पद्धतीशी संबंधित आहे. राज्यात गेल्या तीन वर्षात पर्जन्यमानात घट झाली होती.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने जून 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. तर दुसरीकडे राज्य सरकार जलयु्क्त शिवाय योजनेद्वारे महाराष्ट्र 2019 पर्यंत दुष्काळमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, या योजनेची आकडेवारीही फसवी आहे. गेल्या चार वर्षात अमरावती विभागात अर्थात अर्ध्या विदर्भात सर्वाधिक आत्महत्यांचे प्रमाण आढळून आले आहे. हा आकडा 5214 इतका आहे. तर औरंगाबाद विभागात अर्थात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 4699 इतके आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार. खरं प्रत्येक शासन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न करते .सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते करून दाखवलं आहे. कोणत्या पक्षाचे शासन असताना शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार ही कृती दुर्दैवी व निषेधार्ह आहेच. मग प्रश्न उरतो मोदी म्हणतात तसे फक्त काँग्रेसच्या काळातच शेतकऱ्यांवरच गोळीबार झाला. जर हे खरं असेल तर मग मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात मतदान का केले? या प्रश्नाचे उत्तर काय मिळते. शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी मध्ये प्रदेशमधील शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान जमावाने हिंसक रूप धारण करत 10 ट्रक, पोलिस गाडी आणि दुचाकी जाळल्या. यानंतर जमावाला रोखण्यासाठी आलेल्या पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे कदाचित मोदींना माहित नसावे कारण, त्यावेळेस ते परदेश दौऱयावर असतील. देशाच्या पंतप्रधानांनी आता देशांच्या वास्तवातल्या समस्याबद्दल बोलावे. कारण गेल्या चार वर्षांपासून ते सत्तेत आहेत विरोधक नाही. शेवटी एवढंच कि, मोदींनी खात्रीशीर माहितीच्या आधारावर बोलायला हवे हीच माफक अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com