राष्ट्रसेवा दलाशी उर्मिला मातोंडकरांचं नातं..!

संजय मिस्कीन
शुक्रवार, 29 मार्च 2019

- कांग्रेसची उमेदवारी मिळण्यामागे उर्मिला यांची प्रतिमाच कारणीभुत नाही
- राष्ट्रसेवा दलाशी असलेलं मातोंडकर घराण्याचं नातं महत्वाचे

मुंबई: सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून काॅग्रेस पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. उर्मिला यांच्या उमेदवारीनंतर ‘रंगीला गर्ल’ लोकसभेच्या मैदानात अशी त्यांची ओळख सांगितली जाते. पण कांग्रेसची उमेदवारी मिळण्यामागे उर्मिला यांची बाॅलिवुड मधील प्रतिमाच कारणीभुत नाही. तर पुरोगामी व गांधीवादी विचारांच्या राष्ट्रसेवा दलाशी असलेलं मातोंडकर घराण्याचं नातं देखील त्याहून अधिक महत्वाचे आहे. 

उर्मिला मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ‘ग्रिन्डलेज बॅंक’ मध्ये बॅक कर्मचारी संघटनेचे नेते हाेते. ते राष्ट्र सेवा दलाचे असून उर्मिला याही सेवा दलाशी संबंधित आहेत. राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया बॅंक विमेन फेडरेशनच्या पहिल्या अधिवेशनांत उर्मिला मातोंडकर या विशेष अथिति म्हणून उपस्थित होत्या.

श्रीकांत मातोंडकर यांचे पुरोगामी चळवळीशी निकटचे संबंध असून ते नेहेमीच चळवळीला आर्थिक मदतीसह सक्रीय मदत करीत आहेत. लहानपणापासूनच पुरोगामी कुटूंबात उर्मिला यांचे आयुष्य गेले आहे. उर्मिला स्वत: देखील पुरोगामी विचारधारेशी संबधित आहेत. त्यांचे प्रचंड वाचन असून अगदी परखड व वस्तुनिष्ठ विचार हा त्यांचा स्वभाव आहे. 
त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांना कांग्रेसची उमेदवारी केवळ त्या अभिनेत्री आहेत. ग्लॅमरस आहेत, यामुळे मिळाली नाही तर त्या विचाराने पुरोगामी आहेत. पुरोगामी चळवळीशी त्यांचे नाते अगदी मजबूत आहे. विचारधारा स्पष्ट आहे. उत्तम मांडणी व अभ्यासू संदर्भ हा त्याचा गुण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Miskin Writes an Article on urmila matondkar about rashtra seva dal