Loksabha 2019 : लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हा - बालाजी मंजुळे

Nandurbar-Constituency
Nandurbar-Constituency

नंदुरबार - भारतीय लोकशाहीचा महाउत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीची नंदुरबार मतदारसंघातील तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (ता. २८) सकाळी आठपासून तालुका स्तरावरून मतदान कमर्चारी साहित्यासह आपापल्या ठिकाणी रवाना होतील. मतदानासाठी एकूण साडेदहा हजार कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रांसाठी पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. मतदानासाठी विविध अकरा प्रकारच्या अकरापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात वाढलेले तापमान पाहता ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी सकाळी ऊन कमी असेपर्यंत मतदान केल्यास चांगले होईल, जास्तीतजास्त नागरिकांनी लवकर मतदानासाठी घराबाहेर पडावे, मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रात भ्रमणध्वनी (मोबाईल), कार्डेलेस फोन तसेच वायरलेस सेट नेता येणार नाही, केवळ निवडणूक कामासाठी नेमलेले अधिकृत अधिकारी तसेच पोलिस यांनाच त्यात सवलत असेल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले. मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुधीर खांदे,जिल्हा माहिती अधइकारी किरण मोघे व निवडणूक शाखेचे कमर्चारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले,‘यंदाची निवडणुकीकडे लोकशाहीचा उत्सव म्हणूनपाहिले जात आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावे. यंदा ऊन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळी लवकर मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. मतदानासाठी यंदा राज्यातील पहिले मतदान केंद्र असलल्या मणिबेली (ता. धडगाव) येथील पहिला मतदाराचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. मतदारसंघात सात मतदान केंद्राचे सवर् कामकाज महिलाच पाहणार आहेत.त्यांना सखी मतदान केंद्र असे संबोधण्यात आले आहे. तसेच मतदारसंघात सहा आदर्श मतदान केंद्र निश्चित केले असून तेथे प्रत्येक मतदाराचे स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्राचा परिसर सजविण्यात आला आहे. मातीचे अंगण शेणाने सारवून त्यावर  रांगोळी काढण्यात येईल.

सखी मतदान केंद्रे -  ७
अक्कलकुवा - गंगापूर, जि प. शाळा(११७)
शहादा - शहादा, शारदा गल्सर् स्कूल (१७७)
नंदुरबार - नंदुरबार श्रॉफ हायस्कूल (३५४)
नवापूर - नवापूर, महिला मंडळ इमारत  (१९२)
साक्री - साक्री न्यू इंग्लिश स्कूल (२७६), पिंपळनेर पाटील माध्यमिक विद्यालय (११३)
शिरपूर - शिरपूर, सावित्रीबाई फुले शाळा (२३५)

आदर्श मतदान केंद्रे - ६
अक्कलकुवा - देवमोगरा, जि. प. शाळा (१००)
शहादा - शहादा, व्ही. एन. हायस्कूल, (१७४)
नंदुरबार - नंदुरबार, श्रॉफ हायस्कूल (३५५)
नवापूर - नवापूर, सार्वजनिक विद्यालय (१९३)
साक्री - पिंपळनेर के.एम. पाटील विद्यालय (११०)
शिरपूर - शिरपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (०९)

दिव्यांगांसाठी ‘पीडब्ल्यूडी’ ॲप
दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी आयोगाने पीडब्ल्युडी ॲप उपलब्ध करून दिले अहे. या ॲपच्या माध्यमातून नव्या मतदारांची नोंदणी करण्यासोबतच दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक इतरही सुविधा देण्यात आल्या आहेत. ॲपवर पीडब्ल्युडी मतदार म्हणून नोंदणी केल्यास मतदाराला मतदान केंद्र अधिकारी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ॲपच्या सहाय्याने व्हीलचेअरसाठीदेखील मागणी करता येऊ शकेल. दिव्यांग मतदाराला काही समस्या असल्यात त्याला ॲपद्वारे तक्रारदेखील दाखल करता येईल. या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com