Loksabha 2019 : प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांना समझोता करायचा नव्हता, असा खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यासंबंधीचा घटनाक्रम सांगितला. तसेच वंचित बहुजन आघाडीला तीन जागा देण्यास आघाडीतर्फे अनुकूलता दर्शवण्यात आली असताना त्यांना चार जागा हव्या असल्याने नाशिकची जागा देण्याची तयारी दर्शवली होती, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

‘राष्ट्रवादी’तर्फे नाशिकमधून माजी खासदार समीर भुजबळ यांना दुसऱ्यांदा अन्‌ दिंडोरीमधून शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत प्रवेशकर्ते झालेले माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळ फार्ममध्ये दोघांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, की संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी अशा लढाईत जातीयवादी पक्षांना दिल्लीतून हटवण्यासाठी आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमवेत यावे म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले.

भुजबळ म्हणाले
    घाबरलो असतो, तर सभा घेतल्या नसत्या
    राज्यसभेतील संख्याबळ कमी करणे काँग्रेसला योग्य वाटले नाही
    राज ठाकरेंची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मदत

Web Title: Loksabha Election 2019 Prakash Ambedkar Aghadi Politics