Loksabha 2019 : उदय वाघ यांची अटक व सुटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. 10) झालेल्या मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना झालेल्या मारहाणप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ त्यांच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली आहे.

अमळनेर - जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. 10) झालेल्या मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना झालेल्या मारहाणप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ त्यांच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली आहे. डॉ. बी. एस. पाटील यांना धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजपच्या काल झालेल्या मेळाव्यात वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावर मारहाण केली. डॉ. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघ, शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, संदीप वाघ, देवा लांडगे, एजाज बागवान आदींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. पाटील यांच्याविरुद्ध "ऍट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल झाला आहे. दंगलीच्या गुन्ह्यात वाघ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून लागलीच सुटका केली आहे.

डॉ. बी. एस. पाटील धुळे येथे "आयसीयू'त
मारहाणीत डॉ. पाटील यांच्या नाकाला मार बसला. नाकात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने त्यांच्यावर धुळे येथील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. पाटील यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Loksabha Election 2019 Uday Wagh Fighting Crime Release Politics