Nashik Loksabha 2019 : नाशिकमध्ये भुजबळ की गोडसे?; 55.65 टक्के मतदान

nashik_bhujbal_godse
nashik_bhujbal_godse

नाशिक : समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांनी आव्हान उभे केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघामध्ये जोरदार ताकद लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोडसे यांनी छगन भुजबळ यांना पराभवाचा धक्का दिला होता. यंदा या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सायंकाळी सातपर्यंत 55.65 टक्के मतदान झाले. नाशिकमधील सिन्नर या विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान जास्त झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत नाशिकमधील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : 
सिन्नर : 59.67
नाशिक पूर्व : 52.00
नाशिक मध्य : 55.00
नाशिक पश्चिम : 53.00
देवळाली : 54.00
इगतपुरी : 62.40

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com