Election Results : भंडारा-गोंदियात भाजपचे मेंढे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत.

लोकसभा निकाल 2019 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत. सुनील मेंढे यांना 280187 मते मिळाली तर पंचबुधे नाना जयराम 203011 यांना मते मिळाली आहेत.

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी झाला. तसेच ते अनुभवी असले तरी, समाजात मिसळत नाहीत. त्यामुळे त्यांना कमी मते मिळण्याचा अंदाज आहे. गोंदिया येथील पंतप्रधान मोदींच्या सभा, भंडारा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेनंतर भाजपचा प्रचार वाढला. परंतु, प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना तुल्यबळ मते मिळण्याची शक्यता आहे.

वंचित आघाडीचा प्रभाव नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची काही हजार मतांनी सरसी होऊ शकते. तिसऱ्या क्रमांकाची मते बसपच्या विजया नांदुरकर यांना मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे हे बावणे कुणबी समाजाचे आहेत. तर, सुनील मेंढे हे खैरे कुणबी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs Sunil Mendhe leading in Bhandara Gondia Loksabha Constituency for Lok Sabha 2019