Loksabha 2019 : आघाडीने जागा दिल्या नाही तर स्वबळावर लढणार : संभाजी ब्रिगेड

If the congress NCP does not give us four seats Sambhaji Brigade will fight on its own for loksabha
If the congress NCP does not give us four seats Sambhaji Brigade will fight on its own for loksabha

खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले

डॉ. शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की, 9 डिसेंबरला 2018 ला औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडचा स्वराज्यसंकल्प भव्य मेळावा झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी युतीसाठी निमंत्रण दिलेले असून सिंदखेड राजा येथे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांच्या सोबत काही बैठका झाल्या आहेत. आम्ही बुलडाणा, वर्धा आणि पुणे ची मागणी केली आहे त्याचबरोबर आमच्या काही मागण्या आहेत. पण अजून युतीचा अंतिम निर्णय झालेला नाही जर 18 मार्चपर्यंत युतीचा निर्णय झाला नाही तर संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय 15 व 16 मार्च ला पुणे येथे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक होणार असून तिथे अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी ब्रिगेडची भूमिका बहुजन मताचे विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करायला तयार आहे. परंतु संभाजी ब्रिगेड चा अजेंडा, संभाजी ब्रिगेडच्या काही अटी-शर्ती जर काँग्रेसने मान्य केल्या तर युती होऊ शकते. असे डॉ. भानुसे म्हणाले. अन्यथा आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. कुणाला फायदा कोणाला तोटा होईल याचा विचार आम्ही करणार नाही असे डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.

महाराष्ट्रासह देशात शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार छोटे-मोठे व्यवसाय, लघु-मध्यम व्यापारी, सामान्य नागरिक  मुकबधीर, कर्णबधीर (दिव्यांग) सुशिक्षित बेरोजगार नागरिकांना उध्वस्त करण्याचे काम नरेंद्र मोदी, फडणवीस आणि ठाकरे सरकारने केलेला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचा नुसतं गाजर दाखवून खऱ्या आणि हक्काच्या मागणीपासून पाच वर्षात समाजाला वंचित ठेवलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कुठलेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे निष्क्रिय ठरलेले आहे, आणि एक स्वच्छ आणि चांगला पर्याय म्हणून 'संभाजी ब्रिगेड' ची भूमिका २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे एक राष्ट्रीय पाऊल संभाजी ब्रिगेड उचलणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, दारूबंदी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार, वाढती महागाई, झोपडपट्टी विरहित शहरे, 24 तास पाणीपुरवठा, चांगले रस्ते, वाहतूक सेवा आणि धर्मनिरपेक्ष समाज आदी मूलभूत प्रश्नावर संभाजी ब्रिगेड काम करणार आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक संभाजी ब्रिगेड सक्षमपणे लढवणार असून शंभर टक्के समाजकारण आणि शंभर टक्के राजकारण करण्याचा संभाजी ब्रिगेड चा माणस आहे. याच मुद्द्यावर प्रस्थापित घराण्यांचे व जातीय धार्मिक विद्वेषाचे राजकारण संपुष्टात आणून घराणेशाही संपवण्याचा काम संभाजी ब्रिगेड करणार असल्याचे डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी तीन जागा द्यायचे मान्य केले. मात्र आम्हाला आमची जेथे ताकद आहे, अशा चार जागा हव्या आहेत.

आता आम्ही दोन दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत, असेही ते वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार काय, असे विचारले असता भीमा कोरेगाव प्रकरणानंतर पहिली पत्रकार परिषद आम्ही अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत घेतली. त्यांनतर आमच्या अनेकदा बैठका झाल्या मात्र ते त्यांनी एमआयएला सोबत घेतले असेही ते म्हणाले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे विभागीय कार्याध्यक्ष रवि महाले बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, रामेश्वर वायाळ, जिल्हा सचिव मदन दहातोंडे, खामगांव तालुकाध्यक्ष क्रिष्णा वडोदे, शेगांव तालुकाध्यक्ष विठ्ठल अवताडे, ज्ञानेश्वर निंबाळकर, डिगांबर बोके, सुरज साबळे, गौरव गरड इत्यादी पदाधिकारी हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com