Loksabha 2019 : मुस्लिम लीग रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

अकोला - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २२ ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दोन दिवसांत नांदेड येथे उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम लीगने बुलडाणा आणि मालेगाव या दोन जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत महाआघाडीने निर्णय घेतले. त्यामुळे आता मुस्लिम लीग महाराष्ट्रात काँग्रेस आणि एमआयएमच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे अली यांनी सांगितले. 

मुस्लिम लीगतर्फे वर्धा येथून इम्रान असरफी, नांदेडहून अलताफ अहमद आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मौलबी बाबासाहेब हे निवडणूक लढविणार असल्याची माहिती अली यांनी दिली.

एमआयएमसोबत वंचित बहुजन आघाडीत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांच्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत तमिळनाडूमध्ये मुस्लिम लीगेच चार ठिकाणी नुकसान झाले. अमरावती महापालिका निवडणुकीतही आम्हाला फटका बसला. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांच्यासोबत आघाडी होणार नसल्याचे अली यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Indian Union Muslim League