Loksabha 2019 : दुसऱ्या टप्प्यात प्रचारासाठी जास्त वेळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

अकोला - लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिला तर दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलाला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत तुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना प्रचारासाठी सहा दिवस अधिक मिळणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित तीन मतदारसंघात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार असून, दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना २५ मार्चपर्यंत मुदत आहे पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला आणि तेथून सहा दिवसांनी म्हणजे १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना १४ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. तेच दुसऱ्या टप्प्यात २० दिवस उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.

खर्चाचा ताळमेळ जुळवण्याची चिंता
निवडणूक आयोगाने निवडणूक काळातील खर्च मर्यादा ७० लाख ठेवली आहे.  यामुळे दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. प्रचारासाठी मिळाणारे अधिकचे सहा दिवस प्रचाराचा खर्च वाढविणार असल्याने निवडणूक खर्चाच्या ७० लाखांची मर्यादा पाळून ताळमेळ कसा जुळवावा, अशी चिंता सध्या उमेदवारांना लागली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Second Step Election Publicity Politics