Loksabha 2019 : यवतमाळमध्ये शिवसेना विभागणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

नागपूर - यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार आणि एक खासदार आहेत. येथे शिवसेनेत खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड असे सरळसरळ दोन गट पडले आहेत. या दोघांमधील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर ताई आणि भाऊंच्या संघर्षात शिवसेना विभागणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास लोकसभा लढविणार, असे वक्तव्य संजय राठोड यांनी नुकतेच केले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात मला तयारी करण्याची आवश्‍यकता नाही. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मला निवडणूक लढायला काही अडचण नसल्याचेही ते बोलले. खासदार भावना गवळी यांना ही निवडणूक शिवसेनेकडून लढविताना संजय राठोड गटाकडून अप्रत्यक्ष विरोध राहणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Yavatmal Shivsena Distribute Politics