Loksabha 2019 : तुपकरांच्या ‘स्वाभिमानी’साठी आघाडीत पेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विदर्भात एक जागा देण्यावरून सध्या काँग्रेस आघाडीपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघावरून ‘स्वाभिमानी’साठी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात हातकणंगलेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाआघाडीतील मित्रपक्ष राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली, त्यामुळे महाआघाडीतील या मित्रपक्षाला दुसरी जागा काँग्रेसच्या कोट्यातून देणे क्रमप्राप्त आहे. बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर केल्याने तुपकर यांना घरच्या मतदारसंघात जागाच शिल्लक राहिली नाही, त्यामुळे वर्धा मतदारसंघ काँग्रेसने त्यांच्या कोट्यातून ‘स्वाभिमानी’साठी सोडावा, अशी मागणी जोर धरत होती. 

वर्धा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेससाठी बालेकिल्ला राहिला आहे. शिवाय, सुबोध मोहिते या ज्येष्ठ नेत्याला दुखावणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने विदर्भात ‘स्वाभिमानी’साठी जागा सोडण्यावरून कॉंग्रेसपुढे पेच निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून अकोल्याचा पर्याय सुचविण्यात आला असल्याची माहिती आहे. 

Web Title: Loksabha Election Swabhimani Shetkari Sanghatana Tupkar Politics