Loksabha 2019: भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल लढणार?

 Loksabha 2019: भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल लढणार?

भंडारा: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पटेल यांनी पक्षाला होकार कळवला असून विद्यमान खासदार कुकडे यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रफुल्ल पटेल यांनीच ही जागा लढवावी असा आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पटेलांनी पक्षाला होकार कळवला आहे. रात्री कार्यकर्त्यांशी पटेल यांनी केली चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.

दरम्यान, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपचे उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अधिकृत घोषणा पक्षातर्फे झाली नसल्यामुळे, पक्षाकडे तिकीटाची मागणी केली असल्याचे मेंढे यांनी सांगितले. मात्र, पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर आले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com