Loksabha 2019 : 'अखिलेश, मुलायम भाजपचे एजंट'

पीटीआय
बुधवार, 3 एप्रिल 2019

- अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव भाजपचे एजंट

- ...तर आपण वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार नाही.

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायमसिंह यादव हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप आज भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला. जर आपल्या उमेदवारीने दलित आंदोलनाचे नुकसान होत असेल, तर आपण वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली. 

काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची शक्‍यता वर्तविली होती. आझाद म्हणाले, की अखिलेश यादव यांनी दलितांवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिली. त्यांचे वडील म्हणतात, की मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे. मी नाही, तर ते भाजपचे एजंट आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मी प्रश्‍न उपस्थित केले म्हणून मला एजंट म्हणतात, असेही चंद्रशेखर आझाद म्हणाले. 

Web Title: Akhilesh Yadav and Mulayam Singh Yadav is Agent of BJP says Bhim Army