Loksabha 2019 : भाजपकडून मला संपविण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

'मला संपविण्यासाठी भाजप मला चक्रव्युहात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे,' असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नांदेड : 'मला संपविण्यासाठी भाजप मला चक्रव्युहात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे,' असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. माझ्याविरोधात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन-तीन सभा घेतल्या, भाजपला माझी भीती वाटते, असेही त्यांनी यावेळ सांगितले.

नांदेडमधील भोकर येथील प्रचारसभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजप मला घाबरून तीन सभा घेत आहे व मला चक्रव्युहात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे, राज्यामध्ये मला संपविण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही चव्हण यांनी यावेळी केला.    

अशोक चव्हण नांदेडमधून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे रिंगणात आहेत.  

Web Title: Ashok Chavan made allegations on BJP at Nanded