LokSabha 2019 : वंचित बहूजन आघाडीला बी. जी. कोळसे-पाटलांचा राम राम

Kolase Patil
Kolase Patil

पुणे : उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्धत्या ठाम भूमिकेला वंचित बहूजन आघाडी तडा देत असल्याचे कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. या विषयची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर प्रसिद्ध केली आहे.

या पोस्ट मध्ये कोळसे पाटील म्हणतात, "मी 'वंचित बहूजन आघाडी' ला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे. याचे कारण, मी काल दुपारी माझे 1991 पासूनच परम मित्र अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी, माझे आदर्श पुरुष थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासिकेत बसून चर्चा केली. सर्व गुणदोषासहित काँग्रेस पक्ष, जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखू शकतो, त्यांच्या बरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा पण अनेक अयशस्वी प्रयत्नापैकी एक शेवटचा प्रयत्न केला. मी गेली पाच वर्षे सातत्यानें घेतलेली, खूनी मोदी, शाह विरूद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी त्याला तडा देत आहे याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा मी ठामपणे नाकारलेला आहे. तसं त्यांनी मला सुरूवातीपासूनच, अनेकदा काँग्रेस बरोबर चर्चा करण्याचे कबूलही केलं होतं आणि मी स्वखुशीने ती मध्यस्थी काल पर्यंत करीतही होतो. परंतु, परवा अॅड. बाळासाहेबांनी सर्व उमेदवार जाहिर करून चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. माझी मदत मोदीला झाली तर मी कधीही मलाच माफ करू शकणार नाही. कारण कुणाचीही हिम्मत नसतांना मी मोदी शाह व संघमुक्त भारताची घोषणा केली होती.

सर्व जाती धर्मांतील आणि विशेषत: माझ्या मराठा-कुणबी,SC,ST,Muslim बहिणी भावांनो मी आपल्या सर्वांच्या सर्व दु:खाचे मूळ शोधून त्यांवर मात करून सर्वांना सुखी करण्यासाठी 1976 पासून रात्रंदिवस काम करीत आहे. तसाच मी माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत या ब्राम्ह्यण्यवादी व भांडवलशाहीला विरोध करणारही आहेच. परंतु, आपण सर्व भारतीय अजूनही मानसिक गुलामगिरीतच जीवन जगत अहोत. 'स्वतंत्र विचारांच्या पिढ्यांची निर्मिती हाच खरा विकास' या तत्वाला आमच्या देशांत थारा नाही. कारण स्वर्ग, नरक, 33 कोटी देव ही संकल्पना आमच्या सर्व तार्किक, बौध्दिक, वैज्ञानिक, विकासवादी विचारांना, हजारों वर्षे मारीत आलेली आहे. त्यांतून आम्हां भारतीयांना बाहेर काढण्याची जबाबदारी आमच्या सारख्यां लाखों कार्यकर्त्याचीच आहे. त्यासाठी रात्रंदिवस आम्ही सर्व जण काम करायला बांधिलेले अहोंत. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com