Loksabha 2019 : भाजप म्हणतेय, सोलापूरची सीट गेली तर खबरदार!

bjp
bjp

सोलापूर : उमेदवार कुणीही असो, काहीही झाले तरी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची सीट ही भाजपकडेच राहिली पाहिजे. ही सीट गेली तर खबरदार.... असा निर्वाणीचा इशारा भाजपच्या श्रेष्ठींनी सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना दिला आहे. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर
या दोन्ही मंत्र्यांना भाजप प्रदेश कार्यालयात बोलावून हा इशारा देण्यात आल्याची चर्चा आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह विद्यमान खासदार अॅड. शरद बनसोडे, राज्यसभा खासदार अमर साबळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे या प्रमुख दावेदारांसह उद्योजक राजेश मुगळे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अशोक कटके आणि नगरसेविका संगीता जाधव इच्छुक आहेत. त्यापैकी महास्वामींची उमेदवारी या क्षणापर्यंत अजून अधिकृतपणे घोषित झाली नसली तरी ती निश्चित असल्याची चर्चा आहे. 
इच्छुकांची मांदियाळी असली तरी सुशीलकुमार शिंदे यांना टक्कर कोण देऊ शकेल याबाबत भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकता येणार नाही, त्यासाठी आर्थिक रसदही मोठी लागणार आहे. त्यादृष्टीनेही प्रबळ उमेदवार कोण होऊ शकेल याचीही चाचपणी भाजपच्या श्रेष्ठींकडून केली जात आहे.

दोन्ही मंत्र्यांनी महास्वामींचे नाव पुढे केले आहे. पालकमंत्र्यांनीही महास्वामींचे नाव पुढे केल्याने खासदार अॅड. बनसोडेंनाही धक्का बसला आहे. मात्र त्यांच्यासह भाजपमधील दलित पदाधिकाऱ्यांचा महास्वामींच्या उमेदवारीस विरोध आहे. सामाजिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी जागा राखीव असताना तांत्रिकदृष्ट्या मागास व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजपचे नेते मागासवर्गीवर अन्याय करीत आहेत, अशी भावना रुजू लागली आहे. मागासवर्गीय प्राध्यापक संघटनांनीही महास्वामींच्या उमेदवारीस विरोध केला आहे. त्यामुळे भाजपकडे वळलेल्या दलित मतदारांमध्ये
भाजप विरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यातच महास्वामींच्या उमेदवारीवरून लिंगायत समाजात दोन गट पडले असून, त्याचा 
फटका भाजपला बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इच्छुकांची भाऊगर्दी आणि रोजच्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्थितीत सोलापूरला भाजपचा उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे  दिसून येत आहे. 

वर्षापूर्वी दिला होता इशारा...
दोन्ही मंत्र्यांनी आपसातील भांडणे मिटवून एकत्रित या आणि सोलापूरमध्ये भाजप मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे वर्षापूर्वीच बजावले होते.
मात्र तुम्हा दोघांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्यामुळे भाजपला आज टिकेला सामोरे जावे लागत आहे. इतर मतदारसंघाकडे लक्ष देऊ
नका, मात्र सोलापूरवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे, अन्यथा तुमचे काही खरे नाही, अशी तंबीच या दोन मंत्र्यांना देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com